भुट्टारामनट्टी येथे 35 गवताच्या वैराणी आग : राहुल जारकीहोळी यांच्या कडून 3.5 लाख नुकसानभरपाई
बेळगाव: भूतरमनहट्टी गावामध्ये 35 गवताच्या वैराणी आग लागून नुकसान झालेल्या कुटुंबीयांची युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी भेट घेऊन सांत्वन केले व प्रत्येकी 10 हजार देणार असल्याचे त्यांनी सांगितले
यमकनमर्डी मतदारसंघातील व नवीन वंटमूरी ग्रामपंचायत प्रभागातील भूतरमनहट्टी गावांमध्ये 25 फेब्रुवारी रोजी 35 गंजीला आग लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी आज राहुल जारकीहोळी यांनी भेट देऊन प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये नुकसान भरपाई देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी रामन्ना गोळ्ळी, के पी सी सी सदस्य मलगोंडा पाटील, सुरेश नाईक ग्रामपंचायत अध्यक्ष, मारुती चौगुला ग्रामपंचायत उपाध्यक्ष, सदस्य भीमगौडा पाटील तसेच काँग्रेस नेते व कार्यकर्ते यासंदर्भात उपस्थित होते