तालुक्यातील अनेक गावातील अंगणवाडी कार्यकर्त्यांना गेल्या तीन वर्षांपासून प्लस पोलिओ कार्यक्रमात केलेल्या कामाचे मानधन अद्यापही देण्यात न आल्याने अंगणवाडी कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन वर्षाच्या मानधनासाठी धरणे धरले.
https://fb.watch/bnv0dRzq39/
बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी विभागातील गणेशपुर हिंडलगा मंडोळी हंगरगा आणि बेळगुंदी गावातील अंगणवाडी कार्यकर्त्यांना गेल्या तीन वर्षांपासून म्हणजे 2019 20 आणि 21 व्या वर्षात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात ते मानधन अद्यापही देण्यात न आल्याने अंगणवाडी कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तीन वर्षाचे मानधन मिळावे अशी मागणी केली.
याबाबत अंगणवाडी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना वेळोवेळी विचार केली मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात देण्यात येत असल्याने या सर्व प्रकाराला अंगणवाडी कार्यकर्त्या वैतागल्या आहेत . त्यामुळे जोपर्यंत अंगणवाडी कार्यकर्त्यांचे थकित मानधन मिळत नाही तोपर्यंत त्या पोलिओचे काम करणार नसल्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.