गणेशपूर येथील श्री दत्त महिला मल्टी पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी च्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून भाजप नेत्या धनश्री सरदेसाई उपस्थित होत्या
यावेळी त्यांनी सर्व महिलांना महिला सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन केले तसेच महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन कार्य केले पाहिजे घरदार सांभाळण्याबरोबरच समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करावे असे सांगितले.
यावेळी या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच सर्व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध खेळ आयोजित करण्यात आले असून महिलांनी या सर्व खेळांमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळविली आणि हा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला.