सुशीला कृष्णा बडवाण्णाचे यांचे निधन
बेळगाव कंग्राळगल्लीतील प्रतिष्ठित महिला सुशीला कृष्णा बडवाण्णाचे वय 72 यांचे बुधवार तारीख 16 रोजी सायंकाळी सहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. गुरुवार ता, 17 रोजी सकाळी 8.00 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत रक्षाविसर्जन होणार आहे, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते उमेश बडवाण्णाचे यांच्या त्या मातोश्री होत.