ऑल इंडिया दलित यूथ ऑर्गनायझेशन यांच्या वतीने येथील रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा अशी मागणी करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून या गोष्टीचा लवकरात लवकर विचार करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे
यावेळी सर्व दलित संघटनेच्या वतीने बेळगाव मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे .मात्र येथील रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसावा अशी मागणी केली आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 28 डिसेंबर 1939 रोजी बेळगावला आले होते त्यावेळी त्यांची बेळगावला पहिली आणि शेवटची भेट होती त्यांनी मुंबई ते बेळगाव असा रेल्वेने प्रवास केला होता यावेळी बेळगाव कर्नाटक आणि महाराष्ट्रातले अनेक नागरिक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते तसेच बेळगाव नगराध्यक्ष भीमराव पोतदार यांच्या नेतृत्वाखाली गणाचारी गल्ली बेळगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ महामंडळाचा गौरव देखील करण्यात आला ही गोष्ट शहरवासीयांसाठी अस्मरणीय आठवण आहे.
तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बेळगाव शहरात रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी मल्लेश चौगुले, सुधीर चौगुले, आनंद कांबळे, महादेव तळवार,दलित नेते संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते