हिजाब आणि केसरी शालीच्या वादावरून गेली काही दिवस बंद असलेली महाविद्यालये पोलीस बंदोबस्तात बुधवार पासून सुरू झाली.
पण काही मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून महाविद्यालयात वर्गात बसण्यास परवानगी दिली नसल्याने मुस्लिम विद्यार्थिनी महाविद्यालयातून परत घरी गेल्या.हिजाब चेहरा झाकतो त्यामुळे कोणाचीही वाईट नजर पडत नाही.कोर्ट ऑर्डर येईपर्यंत कॉलेजला येणार नाही.हिजाब घालूनच आम्ही कॉलेजला येणार .हिजाब शिवाय कॉलेजला येणार नाही.तोपर्यंत आम्ही घरी बसून अभ्यास करू.आजपर्यंत आम्ही हिजाब वापरत आलो आहोत.आता हिजाब वापरण्यास परवानगी का दिली जात नाही?हिजाब वापरणे आमचा हक्क आहे आणि आम्ही वापरणारच अशी भूमिका विद्यार्थिनींनी घेतली आहे.
हिजाब आणि केसरी शालीचा वाद उदभवल्यामुळे कर्नाटक सरकारने माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती.सोमवारपासून माध्यमिक शाळा सुरू झाल्या आणि बुधवार पासून महाविद्यालये सरकारच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाविद्यालयाला केवळ गणवेश घालून येण्याची विद्यार्थ्यांना सूचना करण्यात आली आहे.शहरातील सगळ्या कॉलेज परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील कॉलेजना भेट देवून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.