बप्पी लहरी यांचे निधन
संगीतकार-गायक गोल्डन मॅन बप्पी लहरी यांचे निधन झाले आहे त्यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बप्पी लहरी यांना मागील महिनाभरापासून रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. सोमवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी त्यांना घरी सोडण्यात आले मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने या कुटुंबीयांनी डॉक्टरांना बोलावून तपासणी करून घेतली त्यानंतर पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डिस्कोवरील थिरकणारी गाणी अनेक हृदयस्पर्शी गाणी बप्पी लहरी यांनी गायली होते. बप्पी लहरी यांना प्रकृती विषयक अनेक त्रास सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉक्टर दीपक नामजोशी यांनी दिली आहे.