‘ग्रामीण शिक्षण अभियान’ – या उपक्रमाच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील तळवडे गावापासून कणकुंबी येथील शासकीय हायस्कूलपर्यंत 8 किमी चालत जाणाऱ्या आणि 8 किमी पायी चालल्यानंतर गावात परतणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑपरेशन मदत’ च्या वतीने सायकलचे वितरण करण्यात येणार आहे.
या विधार्थाना सायकल मिळाल्यास ते वेळेवर शाळेत जाऊ शकतील, अंधारात लवकर घरी परततील आणि उरलेला वेळ अभ्यासात घालवू शकतील असा विचार करून त्यांना सायकल देण्यात येणार आहे .
खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थी माध्यमिक शिक्षणासाठी झगडत आहेत. ‘ऑपरेशन मदत’ च्या सदस्याने तळवडे गावातून कणकुंबी येथील हायस्कूलपर्यंत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवली .आणि घनदाट जंगलातून 8 किमी पायी चालत गावात परतले .
यावेळी ऑपरेशन मदत’च्या सदस्यांनी विठ्ठल देसाई आणि राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला, याप्रसंगी विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते,
यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. तसेच त्यांना सायकलसाठी मदत करण्याचे ठरविण्यात आले .संस्थेमार्फत पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन करण्याचे आश्वासनही दिले.या विद्यार्थ्यांना लवकरच ग्रामीण शिक्षण अभियानातर्फे सायकल वाटणार असल्याची माहिती तळवडे शासकीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुचित्रा शिराळकर यांनी दिली.