काकतीच्या शिव पाईकांनी मार्लेश्वर, विशाळगड पावनखिंड ते पन्हाळा पायी गडभ्रमंती मोहीम फत्ते केली.
शुक्रवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक काकती येथे सर्व शिवपाईक जमले. प्रेरणा मंत्राने मोहीमेला सुरुवात झाली. शनिवारी सकाळी मार्लेश्वर च्या पायथ्या पासून मोहीमेचा श्रीगणेशा केला. पायथ्यापासून उंचावर असलेल्या मंदीर पर्यंत पोहचून देवाचे दर्शन घेतले. आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर न्याहाळला.काही काळ स्वच्छता केली. तेथे आलेल्या गिर्यारोकांना स्वच्छता राखण्या बाबत माहिती दिली.
त्याच दिवशी पायथ्यापासून असलेल्या चोर वाटेने विशाळगडाकडे प्रस्थान केले. एका दिवसात मार्लेश्वर हून गडाकडे जाणे शक्य नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा या गावी गणपती मंदिर परीसरात पहिली वसती केली. शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी सकाळी पहाटे ठीक 5 वाजता पुन्हा मोहीमेला प्रारंभ झाला. विशाळगडाकडे जाण्यासाठी या दुर्ग वीरांना एकूण 5 उंच उंच डोंगर एकाच दिवसात चढून उतरायचे होते. सकाळी 10 वाजेपर्यंत दुर्गवीरांनी 2 डोंगर पार करत कोचारी या पोहचले. पुन्हा 2 डोंगर पार करत माचाळ या गावी पोहचले दुपारी 12 वाजता पोहचले. मार्ग खूप कठीण होता. दुपारची वेळ असल्या कारणाने सूर्य नारायण अगदी लाल होउन तळपत होता. काट्याकुट्यांची वास होती. पुढे दोन कठीण कडे पार करायचे होते. काही वेळ खूपच कठीण अशी चढाई,तर काही वेळ खूपच कठीण उतार होती. अनेकांच्या पायात काटे रुतत होते, ठेच लागत होती, पायाला असह्य वेदना होत होत्या , काही शिव भक्तांनी तर सुरुवाती पासूनच पायातील पादत्राणे घातली नव्हती, त्यांना तर अधिकच वेदना होत होत्या. हे ध्येयवेडे मनी फक्त विशाळगड ठेऊन चालत होते . शेवटी सर्व वेदना विसरून , कठीण कडे पार करतं 6व्या डोंगराच्या मध्याशी पोहचले. अर्थातच विशाळगडाच्या सर्वात कठीण असलेल्या कोकण दरवाजाने गडावर प्रवेश केला. गडावरील बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधी समोर नतमस्तक झाले. गड न्याहाळत गडाच्या इतिहासाबद्दल जाणून घेतले. गडावरील कचरा आणि गडाची झालेली अवस्था पाहून सर्वांना खुप वाईट वाटले आणि सर्वांनी गडावर काहीकाळ स्वच्छ्ता केली. संध्याकाळच्या वेळी गडाचा निरोप घेतला आणि गजापुर गावाकडे कूच केली.थकलेल्या चेहऱ्यानी गजापुर येथील साई मंदिर परीसरात रात्री विश्रांती घेतली. सकाळी पहाटे 5 वाजता आपल्या ध्येयाकडे अर्थातच पावनखिंडी कडे वाटचाल करु लागले. केंबुर्णेवाडी मार्गे हर हर महादेव चि गर्जना करतं , मुखी महाराजांचे नाव घेत पावनखिंडीत पोहचले. पावनखिंडीत पोहचताच त्यांना जणू स्वर्गात आल्याचा भास झाला. त्या स्वर्गाची हवा खात खिंड पाहू लागले. बाजी प्रभू देशपांडे आणि 300 बांदल मावळ्यांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा दिला. सर्व शिव पाईकांनी खिंड परिसरात तासभर स्वच्छ्ता केली.मार्लेश्वर ते पावनखिंड पर्यंत एकूण 53 किलो मिटर चे अंतर पायी चालत डोंगरातील चढ उतार, कठिण कडे पार करत मोहीम फत्ते केली.शेवटी पावनखिंड येथे असणाऱ्या स्मारकात ध्येय मंत्र म्हणून मोहिमेची सांगता केली.
परतीच्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज तब्बल सव्वा चार महिने वेढ्यात अडकलेल्या किल्ले श्री पन्हाळागड पाहिला. ताराराणी साहेबांचा वाडा, सज्जाकोठी, तीन दरवाजा, अंबरखाना, गडावरील हि महत्वाची ठिकाणे पाहिली. विर बाजी प्रभू देशपांडे आणि वीर शीवा काशीद यांच्या स्मारकाची स्वच्छ्ता तसेच पूजा केली. छत्रपती शिवाजी महाराज मंदिरासमोर नतमस्तक झाले. काही जाणकार धारकऱ्यांणी किल्ल्याची संपूर्ण माहिती सगितली. कोंडाजी फर्जंद यांची लढाई तसेच पन्हाळ्याच्या वेढ्याच्या लढाईंना उजाळा दिला.येथे थोडावेळ स्वच्छता केली आणि गड उतार झाले. विशेष म्हणजे हे शिव भक्त प्रत्येक रविवारी काकती येथील वीर कित्तुर राणी चन्नम्मा यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्याचे संवर्धन करत असतात.