बूडा चेअरमन संजय बेळगावकर यांचा सत्कार
साधना क्रीडा केंद्र बेळगाव यांच्या वतीने क्रीडा केंद्राचे सदस्य आणि खो-खो खेळाडू तसेच बूडा चेअरमन श्रीमान संजय बेळगावकर यांचा सत्कार साधना क्रीडा केंद्राच्या वतीने करण्यात आला .
यावेळी साधना क्रीडा केंद्राचे उपाध्यक्ष शप्रकाश देसाई व प्रकाश नंदिहळ्ळी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्रकाश देसाई म्हणाले की संजय बेळगावकर हे आपले कार्य चोख बजावितात तसेच प्रत्येकाच्या हक्केला धावून जातात .आज पर्यंत त्यांनी अनेक कामे पूर्ण करून सर्वाना मदत केली आहे अशीच मदत येणाऱ्या काळातही त्यांनी करावी असे सांगितले
तसेच सत्काराला उत्तर देताना संजय बेळगावकर यांनी सर्वांचे आभार मानले .याप्रसंगी सतीश बाचीकर, अजित भोसले, उमेश पाटील, वैजनाथ चौगुले, शांताराम कडोलकर, पी. ओ. धामणेकर, शिवानंद कोरे, परशराम यळ्ळूरकर आदी सदस्य उपस्थित होते.