पाणीप्रश्न सुटला नाही तर बांधून ठेवीन :अभय पाटील यांचा एल अँड टी कंपनीला इशारा
बेळगाव शहरातील पाण्याची समस्या कोणत्याही कारणास्तव काळ्या यादीत टाकण्याची गरज आहे, असा कडक इशारा दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
एल अँड टीचे अधिकारी गेल्या आठवडाभरापासून पाईपलाइन लिकेजबाबत तक्रार न करण्याबाबत बेजबाबदारपणा दाखवत आहेत. एल अँड टी कंपन्यांना गती मिळावी आणि काम वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी आज शहरातील पोलीस सभागृहात बैठक बोलविले असल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले .
काल आमदार अभय पाटील यांनी दक्षिण मतदारसंघात दौरा केल्याचे सांगितले.
यावेळी नागरिकांनी L&T विरुद्ध तक्रार केले असल्याचे सांगितले.त्यामुळे शहरात ज्या ठिकाणी गळती आहे ती दुरुस्त केल्यावर देखील आणखीनच का बिघडत आहे .असा प्रश्न उपस्थित केला आहे .
जनतेचे सेवक जनतेचा एकही फोन कॉललाही प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे अशा सेवकांना घेऊन काय करावे असा प्रश्न त्यांनी मांडला आहे तसेच अधिकाऱ्यांना चोवीस तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा योग्य प्रकारे करता येत नाही अशी तक्रार देखील त्यांनी केली आहे .त्याचप्रमाणे बेजबाबदारपणे काम करत राहिल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना दालनात बांधून ठेवावे लागेल. अशी तीव्र प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे
तसेच या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा अभय पाटील यांनी दिला आहे. याप्रसंगी आयुक्त डॉ रुद्रेश घाळी, स्मार्टसिटीचे एमडी प्रवीण बागेवाडी आणि बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.