प्रसंगावधान राखल्याने रेल्वे स्थानकावर आज होणारी दुर्घटना लोको पायलेट आनिरब गोस्वामी यांच्यामुळे टळली स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांना वाचविण्यास एक व्यक्ती पुढे आली ती म्हणजे आनिरब गोस्वामी. मारवाडहुन बेंगलोरला निघालेले बाप लेक यांची रेल्वे बेळगाव रेल्वे स्थानकावर आली असताना मुलीच्या हट्टापायी रेल्वेतून उतरलेल्या मनीष आणि त्यांची मुलगी सानवी या आईस्क्रीम घेण्याकरिता दुकानात गेले होते यावेळी नजरचुकीने त्यांची रेल्वे पुढील मार्गास निघाली रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत नसतानाच तोल जाऊन रेल्वे सोबत ते दोघे फरफटत गेल्याची घटना आज घडली
यावेळी सदर बाब लोकोपायलेट अनिरब गोस्वामी यांनी पाहताच तात्काळ धाव घेऊन रेल्वेखाली सापडण्याचा बेतात असलेल्या बापलेकीला प्रसंग प्रसंगावधान राखून वाचविले.
यावेळी बाप लेकीला मरणाच्या दारातुन खेचून आणलेल्या अनिरब गोस्वामी यांच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.या दुखापतीच्या पुढे या बाप लेकीला वाचवण्याचा आनंद आनिरबच्या चेहऱ्यावर यावेळी दिसत होता .
रेल्वे स्थानक परिसरात त्याच्या या साहसी आणि धाडसी कार्याचे कौतुक होत आहे.
यावेळी बापलेकीचा जीव वाचवल्या बद्दल सुरेंद्र शिवाजी आणि अनगोळकर यांनी अनिरब गोस्वामी यांनी दाखवलेल्या धाडसी कार्याबद्दल त्याचा रेल्वेस्थानकावर सत्कार केला. तसेच रेल्वे खात्याने देखील आमिरचा अभिमान असल्याचे यावेळी उपस्थितांना सांगितले.