बडे मिया छोटे मिया या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार सोबत टायगर श्रॉफ ही आपल्याला दिसणार आहे.
सूर्यवंशी ,अतरंगी रे ,बच्चन पांडे यानंतर आता अक्षय कुमार आपल्या सर्वांना बडे मिया छोटे मिया या चित्रपटात दिसणार आहे. आपल्या बिझी शेड्युलमधून अक्षय कुमार बडे मिया छोटे मिया या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
अक्षय कुमार हा सिनेसृष्टीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक अभिनेता मानला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार ने लागोपाठ त्याच्या चित्रपटांची घोषणा केली होती. त्यामुळे चाहते वर्गाला देखील अक्षय कुमार चे एकापाठोपाठ एक चित्रपट पहावयाची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच आता अक्षय कुमार ने बडे मिया छोटे मिया या चित्रपटाची घोषणा केली असल्याने चाहते भलतेच खूश झाले आहेत.
अक्षय कुमार त्याच्या येणाऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या बिझी शेड्युल मध्ये व्यस्त आहे. तसेच त्याचा येणारा बडे मिया छोटे मिया हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर सुपर हिट होणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.