14 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत खानापूर असोगा रेल्वे गेट नंबर 360 बंद करण्यात येणार आहे. येथील भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आल्याने दिनांक 22 फेब्रुवारी पर्यंत सदर मार्ग नागरिकांसाठी आणि वाहतूकीसाठी बंद असणार आहे.
त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी आणि नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या भुयारी मार्गाचे काम दिलेल्या तारखेपर्यंत पूर्ण करून निश्चित केलेल्या तारखेपर्यंत खुला करण्यात येणार आहे.
तोपर्यंत या मार्गावरून येणाऱ्या नागरिकांनी बाचोळी मार्गाचा आलंब करावा अशी सूचना करण्यात आली आहे. सदर मार्ग पूर्ण होईल तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
यावेळी विजय होळणकर, दीपक मणेरीकर, कल्लाप्पा पाटील, महादेव पाटील,फिलिप रोड्रिग्स, महेश कदम,लक्ष्मण पाटील, कृष्णा पाटील,सुरेश सुळकर व समस्त नागरिक उपस्थित होते.