हिजाब व भगव्या स्कार्फ वरून राज्यात निर्माण झालेल्या तणावामुळे राज्य सरकारने बुधवारपासून माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली होती आता परिस्थिती काही प्रमाणात निवळल्याने नववी आणि दहावीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान पदवीपूर्व महाविद्यालयांचे सर्व पदवी महाविद्यालयांच्या सुट्टीत बुधवार दिनांक 16 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
हिजाब विरुद्ध भगवा या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पीयूसी आणि डिग्री कॉलेज यांना 16 फेब्रुवारीपर्यंत सुट्टी देण्याचा आदेश बजाविला आहे.
हिजाब प्रकरणी मुख्यमंत्री बोम्माई यांनी शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर केली होती. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता दहावीपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते.
मात्र यावेळी पीयूसी आणि डिग्री कॉलेज कधी सुरू करायचे याबाबत निर्णय झाला नव्हता. त्यामुळे या हिजाब प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाविद्यालयांना 16 फेब्रुवारी पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.
या सुटीच्या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू राहतील तसेच आयोजित केलेल्या परीक्षा ऑनलाइन द्वारे घेतल्या जातील असे सांगण्यात आले आहे.