केएलई येथील एमबीए विभाग डॉ. एम एस शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी उद्यमबाग बेळगाव यांच्या वतीने डॉ. शंकर पाटील यांचा कोविड19 महामारीच्या काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रयाग गोखले, एमबीए विभाग प्रमुख यांनी प्रमुख पाहुणे डॉ. शंकर पाटील यांचा परिचय करून दिला व त्यांच्या टीम सदस्यांचे कौतुक केले. KLE MBA च्या 3र्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना आणि त्यांच्या टीमला कोरोना महामारीच्या काळात घेतलेले परिश्रम आणि समर्पण दाखवणारी एक छोटी फिल्म सादर केली.
सामाजिक कार्यकर्ते डॉ शंकर पाटील एक कोविड योद्धा आहेत .त्यांनी बेळगाव मधील अनेक कुटुंबांना रोजच्या जेवणासाठी मदतीचा हात दिला आहे, जवळजवळ 500 कुटुंबांना अंत्यसंस्कारासाठी मदत केली आहे; अन्नाची पाकिटे वाटली, मोफत दवाखाना आणि रुग्णवाहिका सुविधा सुरू केल्या आणि बेळगावच्या लोकांसाठी अनेक उदात्त कामे केले असल्याचे यावेळी त्यांच्या परिचयामध्ये सांगण्यात आले
डॉ.शंकर पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपले असंख्य अनुभव आणि काही भीषण कथा सांगितल्या ज्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. डॉ. शंकर पाटील यांच्या कार्याचा गौरव आणि कौतुक करण्यासाठी, MBA (KLE MBA) विभागाने त्यांचा आणि त्यांच्या टीमचा सत्कार केला आणि भविष्यातील अशा सर्व कामांसाठी मदतीचा हात पुढे केला. प्राचार्य डॉ. बसवराज कटागेरी हे पाहुण्यांच्या कार्याने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी आणि त्यांची टीम करत असलेल्या नोबेल कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले, तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना समाजाच्या विकासासाठी ,उन्नतीसाठी वेळ आणि प्रयत्नांचे योगदान देण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमास एमबीए विभागाचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.