व्हॅलेंटाईन डे वर बंदी आणावी -हिंदू जनजागृती समितीची मागणी
पाश्चात्य संस्कृतीची जोपासना करून भारतीय संस्कृती विसरली जात आहे युवा पिढीच्या माध्यमातून सध्या चंगळवाद जोपासला जात आहे. व्हॅलेंटाईन डे ची संकल्पना साजरी करण्याची परंपरा सामाजिकतेला गुरफटून टाकणारी ठरत आहे त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार थांबविण्यात यावेत अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे.
व्हॅलेंटाईन डे दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालविल्याने अनेक अपघात होत आहेत तसेच काही धर्माध युवक-युवतींना खोटी नावे सांगून त्यांना लव जिल्हादच्या नावाने बळी पडत आहेत .व्हॅलेंटाईन डे मुळे शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था शैक्षणिक वातावरण बिघडत आहे तसेच चंगळवाद वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे व्हॅलेंटाईन डे नावाखाली सुरू असणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी व्हॅलेंटाईन डे वर बंदी आणावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांना केली आहे.
व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर हे हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक वृत्ती घडल्याचे घटना वाढत आहेत तसेच धूम्रपान अंमली पदार्थांचे सेवन आधी प्रकार व्हॅलेंटाईन डे दिवशी हमखास चालविले जातात. त्यामुळे या या सर्वांवर आळा बसावा अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.