कर्नाटकात हिजाब प्रकरण तापले असल्याने विधार्थी कोणत्याही प्रकाराचा निर्णय घेऊन अनुचित प्रकार करु नये या करिता खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी तीन दिवस शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिजाब प्रकरणी कर्नाटक सरकारचा निर्णय न्यायालयातून येणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे निर्णय जाहीर झाल्यावर विद्यार्थी कोणत्याही प्रकाराचा अनुचित प्रकार करून कायदा हातात घेऊ नये याकरिता बुधवार दिनांक 9 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 11 फेब्रुवारी पर्यंत शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता प्राथमिक शाळा सुरु ठेवण्याचा फेरविचार देखील मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद असले तरी पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरू राहणार आहेत.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बेंगलोर येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून याबाबत ट्विट देखील केले आहे. त्यामुळे उद्यापासून शुक्रवार पर्यंत आठवी नववी दहावीचे वर्ग आणि महाविद्यालयीन संस्था बंद असणार आहेत.