वैभवनगर येथे संत सेवालाल यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
बेळगाव: बंजारा समाजाचे कुलगुरू संत सेवालाल व श्री दुर्गा देवी मूर्तीची बेळगाव मधील कलमेश्वर नगर व न्यू वैभव नगर येथे समाजाच्या वतीने स्थापन करण्यात आली.
मूर्ती स्थापनेच्या आधी कलमेश्वर नगर येथील हनुमान मंदिर पासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली .या मिरवणुकीमध्ये बंजारा समाजाच्या संप्रदायक प्रमाणे कळस डोक्यावरती घेऊन महिला ,युवतीनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता .त्याचप्रमाणे भजनी मंडळाच्या भजनात वाजत-गाजत मूर्ती मंदिरामध्ये स्थापन करण्यात आली.
कलमेश्वर नगर व न्यू वैभव नगर येथे स्थापन करण्यात आलेल्या संत सेवालाल देवस्थामध्ये 15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याचे देवस्थान कमिटीने सांगितले.
यावेळी बेलआप्पा पुजारी ,पी .वाय .नाईक ,नामदेव राठोड ,बी.पी लमानी, बसवराज पम्मार ,मारुती पम्मार, मारुती राठोड ,यांच्यासहित बंजारा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.