बसवण कुडची येथे आज मरगाई देवीच्या नुतन मंदिराचा गणहोम
बेळगांव , मंगळवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी बेळगांवातील बसवण कुडची येथे रविवारी मरगाई देवीची मूर्ती प्रतिष्ठापणा आणि कळसारोहण कार्यक्रमानिमित्त मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली होती . त्याचप्रमाणे आज मंदिराचा गणहोम करण्यात आला व आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली व महाप्रसादाला चालना देण्यात आली . या संदर्भात बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की , बसवण कुडची येथील देवराज अरस कॉलनीमध्ये प्राचिन मरगाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे . मंदिराचा कळसारोहण , गृहप्रवेश व वास्तुशांती करण्यात येणार असून आज मरगाई देवीच्या नविन मंदिरामध्ये गणहोम व महापुजा करण्यात आली तसेच महाप्रसादाला चालना देण्यात आली . समस्त गावातर्फे देवीला चांदीचे आभुषण अर्पित करण्यात आले . पाण्याच्या व्यवस्थेसाठी बोरवेल व ओवर टँकला चालन दिली . सर्वांवर देवीची कृपादृष्टी राहु दे अशी आमदार अनिल बेनके यांनी देवी चरणी प्रार्थना केली . यावेळी स्थानिक , पंच कमिटी , समस्त मरगाई देवीचे भक्तजन उपस्थित होते .