हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्मांना अभिवादन
बेळगाव: सीमा प्रश्नाच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शिवसैनिकांना आज अभिवादन करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्रासाठी 8 फेब्रुवारी 1969 साली शिवसेनेने छेडलेल्या आंदोलनात 67 जणांनी बलिदान दिले.त्यामुळे आज अशोक चौकात त्यांच्या बलिदानाचे स्मरण करत सर्व 67 हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून शिवसेनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले
तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा समिती च्या वतीने देखील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना सर्वांनी त्यांना अभिवादन केले.
याप्रसंगी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके प्रकाश मरगळे मालोजी अष्टेकर सरिता पाटील यांच्यासह शिवसैनिक व महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते आणि सीमावासीय मोठया संख्येने उपस्थित होते .