शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत अशीच एक ताजी घटना भर दिवसा घडल्याचे उघडकीस आले आहे. एक दाम्पत्य लग्नाला जात असताना त्यांना रस्त्यात अडवून त्याच्याकडून दागिने लुटण्यात आले आहेत. जुने बेळगाव कोरवी गल्ली येथील रहिवासी गणपत रामचंद्र पाटील आणि त्यांच्या पत्नीला काही अज्ञातांनी अडवून स्वतः पोलीस असल्याचे सांगून सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
सदर दांपत्य लग्नाला बेळगुंदी येथे जात असताना गणेशपुर येथे दोन युवकांनी त्यांची गाडी अडवून त्याना पोलीस असल्याचे सांगितले. तसेच या भागामध्ये दोन दिवस आधी गांजा प्रकरण झाले असून आम्ही तपासणी करत आहोत. आम्हाला तुमच्यावर ही संशय असल्याने तुमच्या गाडीची तपासणी करायची आहे असे सांगितले. यावेळी अज्ञात युवकांनी गणपत पाटील यांच्या पत्नीच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे गंठण काळी मणिहार जबरदस्तीने काढायला लावली रुमाल मध्ये बांधून ठेवतो असे सांगून तेथुन पलायन केले
यावेळी या दाम्पत्यांना आपल्या सोबत लुटमारी झाली असल्याचे लक्षात येताच त्याने या घडलेल्या घडलेली माहिती नागरिकांना दिली. तसेच कॅम्प पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत गुन्हा नोंदविला. याबाबत कॅम्प पोलीस स्थानकात अधिक तपास करीत असून भरदिवसा घडलेल्या या घटनेने नागरिकांमधून खळबळ माजली आहे