वीजवाहीनीत शॉर्ट सर्किटमुळे 35 ते 40 एकरातील ऊस पीक जळून खाक
करंबळ ता खानापूर येथील 35 ते 40 एकरातील ऊस पीक वीजवाहीनीत शॉर्ट सर्किटमुळे ( स्पार्क) होवुन आग लागून जळाले असुन करंबळ गावातील शेतकर्यांचे बरेच नुकसान झाले आहे
ऊसाला आग लागल्याची माहीती मीळताच अग्नीशमन दल दाखल झाले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही यावेळी खानापूरचे तहसीलदार, हेस्कॉमचे अधिकारी,तसेच भाजपाचे युवा नेते पंडीत दादा ओगले, लैला शुगरचे एम डी सदानंद पाटील यांनी त्या ठिकाणी धाव घेतली व भेट दिली यावेळी लैला शुगरचे एम डी सदानंद पाटील यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला असुन ऊस तोडणारी टोळी बोलावून जळालेला संपुर्ण ऊस लैला शुगर (महालक्ष्मी) साखर कारखान्याला आपण घेऊन जाणार असून शेतकर्यांनी घाबरून जाऊ नयेत तसेच ऊस जळालेला असला तरी ऊस बील देताना ऊस बीलात कोणतीही कपात (डीडक्शन) न करता संपुर्ण बील देण्यात येईल असे सांगितले त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकर्याना थोडा दिलासा मिळाला आहे, यावेळी त्यांच्या सोबत पंडित दादा ओगले, कीरण तुडयेकर सदानंद मासेकर करबळ संजू गुरव रामगुरवाडी भूषण ठोंबरे शेतकरी वर्ग उपस्थित होता,