अंडरग्राउंड ब्रीज बांधन द्या यांनी केली मागणी
बेळगाव: कलखांब ,अष्टे ,मुचंडी आणि खनगाव भागातील नागरिकांनी आज केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन आज दिले .
येथील भागातील नागरिकांना दुसऱ्या बाजूला जाण्याकरिता सोयीस्कर व्हावे याकरिता अंडरग्राउंड ब्रीजची बांधून घ्यावे अशी मागणी या निवेदनात या भागातील नागरिकांनी केली आहे
कलखांब अष्टे मुचंडी आणि खनगाव भागात शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच शेतीच्या कामासाठी त्यांना वारंवार रेल्वे रूळ ओलांडून जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयीस्कर व्हावे याकरिता या ठिकाणी दोन अंडरग्राउंड ब्रिज बांधून देण्याची सोय करावी अशा मागणी त्यांनी केली आहे
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन या ठिकाणी रेल्वे ब्रीज तयार करून देऊ असे आश्वासन निवेदन देण्याकरिता आलेल्या नागरिकांना दिले आहे.