पिरनवाडीत ग्रामवन ऑनलाईन सिटीझनसेंटरला प्रारंभ
पिरनवाडी येथे ग्रामवन ऑनलाईन सिटीझन सर्व्हीस सेंटर योजनेचा प्रजासत्ताकदिनी प्रारंभ करण्यात आला.
या सेवेत ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील नागरिकांना एकूण 74 कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. ऑनलाईन उतारा, शिधापत्रिका, आधारकार्ड दुरूस्ती, पोलीस व्हेरीफिकेशन, आयुष्यमान भारत, जात व उत्पन्न प्रमाणपत्र, कामगार कार्ड आदी सेवा उपलब्ध होणार आहेत. पूजा चचडी यांनी स्वागत केले. ग्रा. पं. माजी अध्यक्ष कृष्णाबाई आपटेकर यांच्या हस्ते ग्रामवन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारती चौगुले, लक्ष्मी खवणेकर, सुधा तुडेकर, लता धामणेकर, राणी चचडी आदी उपस्थित होत्या