नवदांपत्यांचा देहदानाचा संकल्प
समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करण्याकरिता संजीव देसाई यांचा मुलगा निखिलेश देसाई आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी रेणुका या उद्या दिनांक 5 फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध होणार आहेत. त्यांचा हा विवाह सोहळा रुपाली कन्वेक्शन सेंटरमध्ये पार पडणार असून विवाह संपन्न झाल्यानंतर नवदांपत्य नेत्रदान अवयवदान आणि देहदानाचा संकल्प ते करणार आहेत.
आपल्या मरणानंतर देखील आपल्या अवयवाचा आणि नेत्रांच्या उपयोग गरजूंना व्हावा. या उद्देशाने नवदांपत्य हा संकल्प करणार आहे.संजीव देसाई हे संजीवनी चारीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून अवयव दान नेत्रदान आणि देहदानाचा प्रचार करत आहेत. त्यामुळे समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करण्यास आणि सामाजिक कार्यास हातभार लावण्यास त्यांचा निखिलेश आणि त्यांच्या भावी पत्नी रेणुका आहे उद्या देहदानाचा संकल्प करणार आहेत.