अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांना बी श्रेणीत समाविष्ट करून अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मात्र एका ग्रामपंचायतीच्या महिलेचे घर सुस्थितीत असताना देखील पडझड झाल्याचे असल्याचे सांगून अनुदान मिळवून घेतले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
येथील हांदिगनूर ग्रामपंचायतीमध्ये एका महिलेने खोटे कागद पत्र जोडून अनुदान मंजूर करण्याकरिता आगळी शक्कल लढविली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
सदर महिला अनुदान मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजल्यानंतर अनुदान मंजूर न करण्याची सूचना ग्रामपंचायतीला अनेक नागरिकांनी केली मात्र त्याची अद्यापही कोणी दखल घेतलेली नाही. तसेच पडझड झालेल्या घरांना अनुदान मिळण्याची सुस्थितीत असलेल्या घरांना अनुदान देण्यात आल्याचे उघडकीस आल्यामुळे ग्रामपंचायती मध्ये चाललेल्या मनमानी कारभारवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट माधुरी पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.