पाळणा घराला अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांचा विरोध नाही मात्र अंगणवाडी पाळणाघर करू नये अशा मागणीचे निवेदन आज अंगणवाडी कर्मचारी आणि हेल्पर फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
पाळणाघरा मध्ये जे पालक आपल्या पाल्यांना सोडून जातात त्यांच्या कामाची वेळ ही सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत असते. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वेळ ही सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ज्यादा वेळ काम करावे लागणार आहे.
याव्यतिरिक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जी कामे आहेत .त्या कामाला त्या न्याय देऊ शकणार नाहीत . बाळंतीन स्त्रियांना इंजेक्शन देणे गरोदर स्त्रियांना धान्याचे वाटप करणे, या शिवाय अंगणवाडी मध्ये येणाऱ्या मुलांचे संगोपन देखील करावे लागते. तसेच अनेक हजार सर्वे अंगणवाडी महिलांना कराव्या लागतात.
जर अंगणवाडी महिला सर्वे करण्यासाठी बाहेर गेल्या तर पाळणा घरांमध्ये ठेवण्यात आलेल्या मुलांकडे लक्ष कोण देणार,किंवा उद्या त्यांना काही झाल्यास जबाबदार कोण असणार असा प्रश्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
भारतात अनेक स्त्रिया बेरोजगार आहेत त्यामुळे या बेरोजगार स्त्रियांना हाताला काम मिळावे याकरिता त्यांची पाळणा घरात नियुक्ती करावी .आणि अंगणवाडी सेविकांना जे काम दिले आहे ते त्यांना योग्य प्रकारे करण्यास द्यावे अशा मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे .