मंदिर जीर्णोद्धारासाठी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन
बेळगाव: येथील अगसगे हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार करिता रिकामी बैलगाडी पळविण्याच्या भव्य जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
येथील कार्यक्रम ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता .प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर बैल गाडी पळविण्याचा स्पर्धेला शुभारंभ करण्यात आला .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते या शर्यतीच्या उद्घाटन करण्यात आले .याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केपीसीसी सदस्य मलगौडा ,माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे,पाटील ,अप्पयगौडा पाटील ,राजू गौडा पाटील, सुनील पाटील, भैरू कंग्राळकर, रामण्णा गुळ्ळी, अरुण मुद्देनावर,सिद्दु सूनगार , रमेश हुक्केरी, राहुल जाधव, यांच्या सहित ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य ,शेतकरी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.