उन्हाळ्यात पाण्याची समस्या उद्भवू नये याकरिता आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून शहरात बोरवेल ची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी शहरातील बोरवेल लोकार्पण सोहळा आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी सकाळी साडेनऊ वाजता टेंगिनकेरी गल्ली येथे बरोबरचा लोकार्पण सोहळा पार पडण्यासाठी त्यानंतर कोनवाळ गल्ली बापट गल्ली काळी अमराई संगमेश्वर नगर शाहूनगर येथे दुपारी बारा पर्यंत आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते बोरवेलचे लोकार्पण करण्यात आले.
उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. त्यामुळे पाण्याची समस्या उद्भवू नये आणि सर्वांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे याकरिता ठिकाणी बोरवेल आणि पाण्याची टाकी ची सोय करण्यात आले असून आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून हे काम करण्यात आले आहे.