आमदार अनिल बेनके यांनी बेळगांव कॅन्टॉन्मेंट बोर्डाची विविध विकास समस्यांबाबत घेतली बैठक
बेळगांव , दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी बेळगांव उत्तर मतक्षेत्रातील आमदार अनिल बेनके यांनी बेळगांव कॅन्टॉन्मेंट बोर्डाची विविध विकास समस्यांबाबत बैठक घेतली . यावेळी विविध विकास समस्यांबाबत व कॅन्टॉन्मेंटच्या सर्वांगिण विकासाबाबत चर्चा करण्यात आली . या संदर्भात बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की , कॅम्प कॅन्टॉन्मेंटच्या परिसरात सजावटीच्या दिवे लावणे गरजेचे आहे , किल्ला तलावचा पर्यटन स्थळ म्हणून पुनर्विकास चालु आहे आणि कुटुंबांसाठी सुट्टीच्या दिवशी पिकनिक पार्कसाठी किल्ला तलावाकडे असलेली कॅन्टॉन्मेंटची जागा पार्किंग सुविधासाठी द्यावी तसेच पीबी रोडचे जुने भाजी मार्केट जेथे बेकायदेशीर कामे चालली आहेत तेथे पुनर्विकास करुन स्मार्ट सिटी अंतर्गत शॉपिंग , ट्रेड कॉम्ल्पेक्स करण्यात यावा असा आमदार अनिल बेनके यांनी स्मार्ट सिटीला प्रस्ताव दिला आहे . या संदर्भात मराठा लाईट इंफेंन्ट्रीचे सीइओ व अधिकारी उपस्थित होते .