कोंडसकोप नजीकच्या हनुमंतवारी परिसरातील रानमाळावर मानवी हाडे आणि कवटी आढळल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.पोलिसांनी
याठिकाणी सापडलेले मानवी हाडे आणि कवटी ताब्यात घेतले असून याबाबत अधिक शोध घेत आहेत.
याबाबत बस्तवाड येथील मारुती पिराजी बेळगावकर यांना मानवी हाडे आणि कवटी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
येथील माळरानावर कवटीपासूनच जवळच मानवी हाडांच्या जवळ जबडा जीन्स पॅन्टचा तुकडा सापडला असल्याने हा खुनच आहे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ऍसिड टाकून मृतदेह जाळला असल्याचा संशय बळावला आहे.
याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वैज्ञानिक पृथकरणानंतर या प्रकरणाचे गुढ उलगडणार आहे