सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते विविध विकास कामाला चालना
बेळगाव: यमकनमर्डी मतदारसंघातील कडोली जिल्हा पंचायत भागातील गावांमध्ये आमदार सतीश जारकीहोळी यांच्या आज विकास कामाला विविध विकास कामाला सुरुवात करण्यात आली. मंनिकेरी गावामध्ये शिवाराचे रस्त्याचे डांबरीकरण 50 लाखाचा निधी तसेच मारुती गल्ली येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
केदनुर गावातील उच्च प्राथमिक कन्नड शाळा तसेच मराठी शाळा येथील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींचे उद्घाटन करण्यात आले तसेच गावामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या 50 हजार लिटर पाण्याच्या टाकीचे टाकीचे लोकार्पण करण्यात आले व केदनुर ते बंबरगा पर्यंतच्या रस्त्यासाठी 3 कोटीचा निधी मंजूर करून भूमीपूजन करण्यात आले.
कडोली गावामध्ये आंबेडकर भवन व नव्याने बांधण्यात आलेल्या 2 अंगणवाडीच्या इमारतीचे व व्यायाम शाळेचे उद्घाटन तसेच प्रभूनगर येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, हायटेक ग्रंथालय ,तलाठी ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले .