बिदर जिल्ह्यातील हुमणे तालुका तहसीलदार प्रदीप कुमार हिरेमठ हे ड्युटीवर असताना काही गैर प्रकारांनी शासकीय कर्तव्यात हस्तक्षेप करून तहसीलदारांना मारहाण केली. त्याचा निषेधार्थ आज कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
सरकारी कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचा अचानक हल्ला करण्यात येत आहे. अशा या घटनांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना भीतीच्या वातावरणात काम करावे लागत आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये याकरिता दोषींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
तसेच अशा या घटना वारंवार घडत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सुविधा पुरवावी आणि त्यांना भयमुक्त वातावरणात काम करू द्यावे अशी मागणी देखील कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.