मेक देम स्माईल फाउंडेशन तर्फे बेळगाव ग्रामीण क्रिकेट ॲकॅडमी क्रिकेट किट प्रधान
बेळगावच्या ग्रामीण भागातील मुला-मुलींना क्रिकेटचे मार्गदर्शन मिळावे यासाठी गेली काही वर्षे क्रिकेटपटू व प्रशिक्षक सूनील देसाई हे प्रयत्न करीत आहेत यांच्या प्रयत्नांना हळूहळू यश प्राप्त होत आहे. त्यांच्या या प्रयत्नातून प्रजासत्ताक दिनी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा गौंडवाड येथे मेक दम स्माईल फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशनचे अध्यक्ष सर्फराज खतीब यांच्यातर्फे उदयन्मुख खेळाडूंना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळावे .यासाठी बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमीला क्रिकेटची कीट देण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा अष्टेकर यांच्या हस्ते सर्फराज खतीब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर प्रशिक्षक सुनील देसाई यांचा ही सत्कार करण्यात आला. बेळगावच्या महिला क्रिकेटपटू श्रेया पोटे व जुया काजी यांना ग्रामपंचायत सदस्य रेखा सुतार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमाला एसडीएमसी अध्यक्ष महेश सांबरेकर इतर सदस्य शिक्षक वर्ग खेळाडू बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एन .सी .जाधव यांनी केले.