गोव्यातील निवडणुकीसाठी प्रचाराला गेलेल्या बेळगाव महानगर अध्यक्ष शशी पाटील यांनी आपलाच नग्न फोटो एका व्हॉट्सॲप गृपवर पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे.पाटील हे सध्या गोव्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत .पक्षाचा प्रचार करण्यासाठी गेलेल्या भाजप महानगर अध्यक्षांनी आपलाच नग्न फोटो पोस्ट करून प्रसार माध्यमे आणि विरोधक यांच्या हाती आयतेच कोलीत दिले आहे.पाटील यांनी भाजप दक्षिण ग्रुपवर आपला नग्न फोटो पोस्ट केला आणि काही वेळात तो व्हायरल झाला.पक्षाच्या कार्यकर्त्यांना संदेश देण्यासाठी आणि कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी या ग्रुपचा वापर केला जातो .या नग्न फोटोच्या पोस्ट मुळे भाजप कार्यकर्त्यात देखील खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे या ग्रुप मध्ये महिलाही आहेत.ही पोस्ट पाहून अनेकांनी ग्रुप मधून बाहेर पडणे पसंद केले.एकूण हे नग्न फोटो प्रकरण पाटील यांना अंगलट येणार अशीच चर्चा सुरू आहे.भाजप चे वरिष्ठ या बाबत कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.