*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव तर्फे काकती शाळेत शैक्षणिक साहित्य वितरण*
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे बुधवारी काकती येथील सरकारी मराठी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
ग्राम पंचायत उपाध्यक्षा सौ. वर्षा मुचंडीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक किरण करंबळकर यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्याचे कौतुक करीत पालकांनी विद्यार्थ्यांना मराठी शाळेत पाठवून देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी आशिष कोचेरी यांनी युवा समीतीच्या शैक्षणीक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमां बाबत महिती दिली आणि गावातील युवकांनी शाळेतील पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. समितीचे जेष्ठ नेते लक्ष्मण पाटील यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परिक्षांबाबत मार्गदर्शन केले. युवा समितीच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. गावात एक बाल साहित्य संमेलनाची कल्पना त्यांनी मांडली. रजक समाजाचे अध्यक्ष गणपत सूरेकर यांनी शाळेत होणाऱ्या सुधारणेबाबत सांगीतले.
मराठी शाळेसाठी झटणारे माजी विद्यार्थी तसेच ग्राम पंचायत सदस्य प्रवीण रेडेकर आणि महेश रंगाई तसेच बंगळूर स्थित अभियांत्रिकी क्षेत्रातील माजी विद्यार्थी अनिकेत वार्नोळकर यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच ईतर वर्गातील गरजु आणि होतकरू विद्यार्थांना शैक्षणीक साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष सोमनाथ ऋटकुते, उपाध्यक्षा आरती गवी, ग्राम पंचायत सदस्या सौ.सरिता कोचेरी, सौ.मिलन सोनुलकर, मराठी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी दिनेश मोळेराखी, सामाजिक कार्यकर्ते अनिल नार्वेकर, विनायक केसरकर , दैनिक तरुण भारत चे पत्रकार अरुण टूमरी, शिक्षक, पालक तसेच विध्यार्थी उपस्थीत होते.
शिक्षिका एस.जी.कीत्तुर यांनी आभार मानले आणि शिक्षिका एस. व्ही. पाटील यांनी सूत्रसंचलन केले.