**चव्हाट गल्ली मराठी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
सरकारी मराठी शाळा नं 5 चव्हाट गल्ली येथे 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दिपक किल्लेकर हे होते.
प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री के.आर.कडोलकर यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले.व उपस्थीत मान्यवरानि दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला चालना दिली.
याप्रसंगी अनेक विध्यार्थ्यानी विविध भाषेतून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आपल्या मनोगतामधून व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री किल्लेकर यानी सर्वाना शुभेच्छा देत लोकशाहीचे महत्व आपल्या मनोगतामधून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही.व्ही.पाटिल यांनी केले तर श्री प्रशांत पोवार यानी आभार मानले.
या प्रसंगी एस.डी.एम.सी.चे अध्यक्ष श्री अशोक अष्टेकर,सर्व पदाधिकारी,श्री विठल भट्ट,सर्व शिक्षक, विध्यार्थी व पालक उपस्थीत होते.