कोरोना आणि ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने सौंदत्ती यल्लामा मंदिर बंद करण्यात आले.
त्यामुळे शाकंभरी पौर्णिमा निमित्त होणारी यात्रा रद्द करण्यात आली. त्यामुळे हलगा येथील श्री रेणुका देवीची यात्रा येथील मराठी शाळेच्या ग्राउंड मध्ये भरविण्यात आली.
यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून गावकऱ्यांनी आणि पंच कमिटीने या यात्रेचे आयोजन सध्या पद्धतीने केले होते. यावेळी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेऊन यात्रा उत्साहात पार पडली.