दहावीचा निकाल चांगला लागावा यासाठी शिक्षक आपल्या परीने जमेल तितकी मदत आणि प्रयत्न विद्यार्थ्यांना करत असतात. तसेच पुस्तकांच्या माध्यमातून देखील सर्व अभ्यासाची तयारी करतात. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील 195 माध्यमिक शाळांमधील दहावीच्या 56 हजार 856 विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त अशा पुस्तकांच्या 13 लाख रुपये किंमतीच्या पंधरा हजार प्रती वितरित केल्या जाणार असल्याची माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी संगम हॉटेलच्या सभागृहात दिली.
सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने चिकोडी आणि बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचा वितरणाचा शुभारंभ काल उत्साहात पार पाडण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तके सहज उपलब्ध व्हावीत यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती यावेळी जारकीहोळी यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास करून जास्तीत जास्त गुण प्राप्त करावेत आम्ही चांगल्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन पुढे समाजकार्यात हातभार लावावा असे प्रतिपादन यावेळी केले.
तसेच याप्रसंगी त्यांनी यमकनमर्डी मतदार संघात शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने आमदार निधीतून चार हजार डेट्स चे वितरण अरुणा काळात दोन वर्षात विद्यार्थ्यांना एक लाख फेस मास्कचे वाटप आणि कम्प्युटर्स वितरण केले असल्याची माहिती याप्रसंगी दिली. या कार्यक्रमाला माजी मंत्री एम बी पाटील माजी आमदार डी एम चंद्रप्पा यांनी उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी आमदार गणेश हुक्केरी , आमदार डा . अंजली निंबाळकर , माजी आमदार अशोक पट्टण , एस . बी . घाटगे , रमेश कुडची , काकासाहेब पाटील , बेळगाव ग्रामीण काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विनय नावलगट्टी , विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी , माजी मंत्री वीरकुमार पाटील , युवा नेते राहुल जारकीहोळी , प्रियांका जारकीहोळी , काँग्रेस नेते गजानन मंगसुळी , बी . सोमशेखर , अशोक पुजारी , महावीर मोहिते , बाळासाहेब पाटील , इस्माईल तमुटगार , विश्वास वैद्य , बसवराज कौजलगी , बेळगाव सार्वजनिक शिक्षण खात्याचे उपसंचालक बसवराज नलतवाड , चिकोडी सार्वजनिक शिक्षण खात्याचे उपसंचालक मोहन हंचाटी आदींसह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी – विद्यार्थिनी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते .