त्या तिघींनी केली अज्ञात्याला मदत
बेळगाव :आजही माणुसकी टिकून आहे त्याचे ज्वलंत उदाहरण आज दिसून आले. कचरा गोळा करणाऱ्या तिघींनी मिळवून एका अज्ञात व्यक्तीची काहीही माहिती नसताना त्याला मदत करुन माणुसकी अजून जिवंत आहे हे दाखवून दिले आहे.
थंडीत कुडकुडत असलेल्या 60 ते 65 वयोगटातील एका व्यक्तीला आपल्याजवळील शाल ,कचरा गोळा करणाऱ्या महिलांनी घालून थंडीत कुडकुडणाऱ्या व्यक्तीला मदत केली आहे. दैनंदिन कचरा गोळा करणाऱ्या शारदा भारती आणि माया या तिघींनी मिळून टिळकवाडी येथील दुसरे रेल्वे गेट जवळ असलेल्या एका अज्ञात व्यक्तीला मदत केली आहे.
सदर व्यक्तीला दिलेली मदत पाहून या ठिकाणाहून जात असलेले समाजसेवक प्रसाद कुलकर्णी यांनी या गोष्टीची कल्पना सुरेंद्र अनगोळकर यांना दिली. त्यांनी ताबडतोब संतोष दरेकर यांना ही माहिती दिली .यावेळी टिळकवाडी पोलीस स्टेशनला याबद्दल माहिती देऊन सुरेंद्र अनगोळकर यांचा रुग्णवाहिकेतून त्या अज्ञात व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले.
याकामी प्रसाद कुलकर्णी नारायण गावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अज्ञात व्यक्तींना मदत करून त्यांना आधार देण्याचे काम अशा या कार्यामधून दिसून येत असून माणुसकीचे दर्शन देखील घडत आहे. त्यामुळे अशा थंडीत कुडकुडणाऱ्या अज्ञात व्यक्ती कुठेही दिसल्यास सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.