छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत आहे . कर्नाटकात बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचा काही कन्नड गुंडांनी अवमान केला . देशातील महाराष्ट्रातील व सीमा भागातील मराठी बांधवानी याचा लोकशाही मार्गाने निषेध नोंदवला व या प्रकाराची गांभीर्याने चौकशी कर्नाटक सरकारने करावी अशी मागणी यावेळी महाराष्ट्र व सीमा भागातील बांधवांनी केली .
कर्नाटक सरकारने चौकशी तर केलीच वर ६१ मराठी भाषीकांवर बेळगांव येथे राज्यद्रोह व कलम ३०७ प्रमाणे गुन्हे दाखल करून धरपकड केली व सीमा भागातील मराठी बांधवांना तुरुंगात डांबले अद्यापही त्यांना जामीन मिळाला नाही . उर्वरित जे भुमिगत झाले आहेत त्यांचेवरही धरपकड व त्यांचे कुटूंबावर दबावतंत्र सुरु आहे . सीमा भागातील मराठी भाषिकांवरचा अन्याय शिवसेना कदापि सहन करणार नाही . म्हणून सीमा भागातील बांधवांचेवरील राज्यद्रोह्याचे गुन्हे कर्नाटक सरकारने मागे घ्यावेत व त्यांना तुरुंगातून मुक्त करावे या मागणीसाठी शिवसेनेचे वतीने दिनांक २२ जानेवारी २०२२ सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा , टाऊन हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुर्तीला अभिषेक घालुन कोल्हापूर ते बेळगांव मराठी भाषिकांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान दांडी मार्च व तुरुंग मुक्ती आंदोलन सुरू करून कागल मार्गे महाराष्ट्रावरून निघून पवित्र भगवा ध्वज घेऊन कर्नाटकात मराठी भाषिकांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान दांडी मार्च व तुरुंग मुक्ती आंदोलन निघणार आहे .
तमराठी भाषिकांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान दांडी मार्च व तुरुंग मुक्ती आंदोलन महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोहचलेनंतर सीमा भागातील बांधव यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज मुर्तीवर पंचगंगा , दुधगंगा , वेदगंगा , कुंभी , हिरण्यकेशी या पाच नद्याचे पाणी आणून दुग्ध अभिषेक घालणेत येईल व नंतर ही दिंडी सीमा भागाकडे रवाना होईल .असे शिवसेनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.