गोवा मिरामार पणजी येथे मिशन ऑलंपीक गेम्स असोसिएशनने आयोजित केलेल्या रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूनी घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेत बेळगावच्या काही स्केटिंगपटूनी या स्पर्धेत भाग घेऊन दोन सुवर्ण एक रौप्य आणि तेरा कास्यपदक मिळविली आहेत.
दिनांक 15 आणि 16 जानेवारी रोजी गोवा येथील युथ हॉस्टेल स्ट्रीट वर पार पडलेल्या या स्पर्धेत स्पीड स्केटिंग विधीत कल्याण कुमार बि याने दोन सुवर्ण,वरद कोलमकर याने एक रौप्य व एक कास्य,तर बाकीच्या सर्व स्पर्धकांनी कास्यपदके पटकाविली आहेत.
या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चे अध्यक्ष उमेश कलगटगी प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या स्पर्धेतील सर्व विजेते स्पर्धक गेल्या अनेक वर्षांपासून केएलई सोसायटीच्या लिंगराज कॉलेजच्या स्केटिंग रिंग वर सराव करतात.त्याच बरोबर बेळगाव शहरातील गोवावेस येथील रोटरी कार्पोरेशन स्पोर्ट्स अकॅडमी आणि गणेशपुर रोड येथील सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅकवर सराव करतात. या सर्व स्केटिंगपटूना डॉ प्रभाकर कोरे माजी आमदार श्याम घाटगे राज घाटगे योगेश कुलकर्णी मंजुनाथ मंडोळकर यांच्यासह इतरांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभते आहे.