यासंबंधी उच्च न्यायालयानेही बजावला आदेश
कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वाढत चालला आहे.त्यामुळे सर्वजण आवश्यक ती खबरदारी घेत आहेत. याच बरोबर संवेदनशील विभागात नियमावली जारी करण्यात आली आहे. आता कोरोना वाढत असल्याने त्याचा संसर्ग रोखण्याकरिता न्यायालयीन कामकाजासाठी सुधारित नियमावली तयार करण्यात आली आहे.
जिल्हा व तालुका स्तरावर न्यायालयीन कामकाज करताना covid-19 चे नियम पाळावे तसेच कामगार न्यायालय लवाद व तत्सम न्यायालयांनी याचे पालन करावे अशी सूचना करण्यात आली असून याबाबत उच्च न्यायालयांच्या निबंधकांनी शुक्रवारी याबाबतचा आदेश बजावला असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे.
सर्व जिल्ह्यांमध्ये दररोज कोविड-19 पॉझिटिव्ह प्रकरणांची नोंद होत असल्याने जिल्हा आणि खटल्याच्या न्यायव्यवस्थेच्या कामकाजावर काही काळ निर्बंध घालण्यात आले आहेत .त्यानुसार आज पासून म्हणजे 17 जानेवारीपासून सर्व जिल्हा आणि खटल्याच्या न्यायालयांमध्ये (कौटुंबिक न्यायालये, कामगार न्यायालये, लघु कारण न्यायालये, औद्योगिक न्यायाधिकरणासह) मानक कार्यप्रणाली लागू केली गेली आहे
फिजिकल फाइलिंगसाठी मुख्य न्यायालयाच्या इमारतीबाहेर पुरेशा संख्येने काउंटर उभारले गेले आहेत . फाइलिंग काउंटर वकिल सामाजिक अंतर राखून रांगेत थांबू शकतील अशा प्रकारे केले आहेत.तसेच फौजदारी आणि दिवाणी प्रकरणे, कोर्ट फी आणि प्रक्रिया शुल्क भरणे, अर्जांची प्रत करणे, चलन सबमिट करणे यासाठी स्वतंत्र फाइलिंग काउंटर प्रदान करण्यात आली आहे .उच्च न्यायालयांच्या निबंधकांनी शुक्रवारी याबाबतचा आदेश बजावला असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे.