गावामध्ये उपक्रम आणि कार्यक्रम आयोजनासाठी यांनी दिली मदत
बेळगाव:यमकनमर्डी मतदार क्षेत्रात अनेक उपक्रम राबविण्यात अडचणी येत आहेत.याठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम उपक्रम राबविण्यास गावकऱ्यांना खुर्च्या उपलब्ध नसल्याने नागरिकांना जमिनीवरच बसून कार्यक्रम घेण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेनुसार कडोली जिल्हा पंचायत व्यापतीतील मनिकेरी केदनूर गावाला केपीसीसी सदस्य मलगोंडा पाटील यांनी भेट देऊन गावामध्ये कार्यक्रम योजनाकरिता खुर्च्यांचे आणि साऊंड सिस्टिम चे वितरण केले.
या गावांना खुर्च्या आणि साउंड सिस्टीम चे वितरण करण्यात आल्याने आता या गावांमध्ये सार्वजनिक कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यास सोयीस्कर ठरणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
प्रत्येक गावात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास आमदार सतीश जारकीहोळी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांचे स्वीय सहाय्यक आणि केपीसीसी सदस्य मलगोंडा पाटील यांनी केले. त्याप्रसंगी आणि कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.