मुख्यमंत्री बदलासंदर्भात कर्नाटकात अनेक अफवा कुठल्या आहेत. यासंदर्भात रमेश जारकीहोळी यांनी आज प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरण दिले आहे. नव्या मंत्रिमंडळात अनेक चेहरे नवे असले तरी मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्माई कायम असणार आहेत असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले आहे.
नवी मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात अनेकांची भेट घेऊन चर्चा करण्यात येत आहे. त्यामुळे अरुण सिंग अमित शहा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखालीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे जारकीहोळी यांनी पत्रकारांना सांगितले. ते अथणी येथे आरएसएस प्रमुखांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
तसेच संक्रांतीनंतर मंत्रिमंडळ विस्तार ची शक्यता असल्याचे यावेळी रमेश जारकीहोळी यांनी सांगितले असून मुख्यमंत्रीपदी बसावराज बोम्माई हेच असतील असेही स्पष्ट केले आहे.