पाण्याचा अपव्ययाकडे महानगरपालिका लक्ष देणार का ?
अलारवाड व कुडची येथील पिण्याचे पाणी बंद करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून येथील पाणीपुरवठा बंद आहे.तसेच या ठिकाणी असलेले पंपसेट देखील बंद करण्यात आले आहे.
मात्र येथे असलेल्या टाकीतून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे याच्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून त्यांचा दुर्लक्षामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. एकीकडे शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे.
तर दुसरीकडे अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.त्यामुळे याठिकाणी महानगर पालिकेने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे