या चिमुकल्याच्या उपचाराकरीता यांनी दिली मदत
बेळगाव :सर्वांच्या उपचारासाठी सर्व स्तरातून मदत करण्यात येत आहे. फुल ना फुलाची पाकळी म्हणून अनेक जण आपापल्या परीने सर्वमच्या उपचाराकरता आर्थिक मदत देत आहे. अशीच मदत मनिकंट ग्रुपच्या वतीने करण्यात आली.
श्री मनीकंट ग्रुप च्या वतीने दरवर्षी येथील दैवज्ञ मंगल कार्यालयामध्ये आय्याप्पा स्वामींची पूजा करण्यात येते. मात्र या वर्षी कोरोनाचे संक्रमण असल्याने तसेच सरकारने घालून दिलेल्या नियमांमुळे मोठ्या प्रमाणात करण्यात येणारे आय्याप्पा स्वामींची पूजा छोटया प्रमाणात करण्यात आली.
या वेळी पूजा निमित्त जमलेल्या सर्व भाविकांनी सर्वमच्या आरोग्याकरिता प्रार्थना केली. तसेच त्याप्रसंगी उपस्थित असलेल्या भाविकांनी आणि मनिकंट ग्रुपच्या सदस्यांनी जमविलेले पैसे सर्वम बाळेकुंद्री या चिमुकल्यांच्या उपचाराकरिता दिले.