पतंजली योग समितीतर्फे होमहवण आणि सत्कार समारंभ संपन्न
बेळगाव: पतंजली योग समिती कंग्राळी बुद्रुक येथील योग वर्गातर्फे होमहवण तसेच बेळगाव बार असोसिएशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष वकील सुधीर चव्हाण त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योग प्रशिक्षक मोहन बागेवाडी तर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव पतंजली योग समितीचे प्रमुख किरण मन्नोळकर, मदनभाई पटेल, ज्योतिबा भादवणकर, पुरुषोत्तम पटेल, दीपक पानसरे, संगीता खानापुरे, कल्याणी देसाई इतर मान्यवर व योग साधक उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात प्रभाकर पाटील यांच्या प्रास्ताविका ने झाली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे योग समितीतर्फे स्वागत करण्यात आले. त्यानंतर होमहवण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी बेळगाव बार असोसिएशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुधीर चव्हाण यांचा निवडून आल्याबद्दल शाल व श्रीफळ व पतंजली योग योद्धा पथद देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रभाकर पाटील व महेश आष्टीकर यांचा ही योग समितीतर्फे योग योद्धा पथद देऊन गौरव करण्यात आला. …
यावेळी किरण मन्नोळकर यांनी कंग्राळी बुद्रुक येथे गेल्या 10 वर्षापासून अखंडितपणे सुरू असलेल्या योग वर्गाचे प्रसंशा करून कौतुक केले. तसेच गावामध्ये मोफत सुरू असलेल्या योग वर्गाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.