अत्यावश्यक सेवा वगळता इतरांवर कडक निर्बंध
बेळगाव :ओमिक्रॉन व कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता राज्य सरकारने विकेंड कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला आहे .त्यामुळे शुक्रवार रात्री 10 पासून सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे .याकाळात कडक निर्बंध असले तरी अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे .या कर्फ्यू काळात काय चालू आणि काय बंद याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे .
या विकेंड कर्फ्यूत दारू दुकाने, चप्पल, कपडा, मोबाइल दुकाने, गरज नसलेल्या वस्तूंची दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच या गोष्टीचे कोणी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा आदेश बजाविला आहे .
तर औषधे, खाद्यपदार्थ, किराणा सामान, फळे, भाजीपाला, मांस मच्छी डेअरी दुग्ध पदार्थ,पशु खाद्य, कायदा विषयक कार्यालये, उद्योगधंदे, रेशन दुकानने याशिवाय किरकोळ भाजी मार्केट व होल सेल भाजी मार्केट सुरू राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे